केदार सामंत : ९८२२३०९८८७, ८२७५३९०९०९

३ राज्यस्तरीय एकांकीका स्पर्धेत प्रथम क्रमांक

३ वर्षे बॅ. नाथ पै एकांकिका स्पर्धेत, कणकवली येथे प्रथम क्रमांक

चंदु शिरसाट : ५ वेळा सर्वोत्कृष्ठ दिग्दर्शक पुरस्कार

वर्षा सामंत : ३ वेळा स्त्री-अभिनयाचे प्रथम पारितोषिक

बाबा वर्दम थिएटर्स, कुडाळ

अवघी २५००० लोकवस्ती असलेले कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ हे गांव. या कुडाळ नगरीचा कलेचा वारसा फार जुना आहे. रंगदेवतेच्या आणि आदरणीय श्री. एकनाथजी ठाकूर साहेब यांच्या आशीर्वादाने सर्व गुणवंत कलाकारांसोबत "बाबा वर्दम थिएटर्स" हा हौशी नाट्यसंघ, गेली ४७ वर्षे कोकणची रंगभूमी आपल्या नवनवीन, कल्पक व देखण्या नाट्य कलाकृतींनी गाजवत आहे. पूर्वी अनेक हौशी नाट्यमंडळे कुडाळमध्ये स्थापन व्हायची. प्रयोगही होत असत. परंतु ती नाट्यमंडळे तात्पुरत्या कालावधीसाठी असायची. दरवर्षी नित्यनेमाने नाट्यकलाकृती सादर करून सातत्याने मनोरंजन व अभिनय कलेची सेवा साधणारी कुडाळमधील 'बाबा वर्दम थिएटर्स' ही नाट्यसंस्था विरळीच. नाट्यकला जोपासण्याची प्रेरणा देणाऱ्या कै. बाबा वर्दम यांचेच नाव धारण करुन १९७८ मध्ये 'बाबा वर्दम थिएटर्स, कुडाळ' या नावाने नाट्य निर्मिती सुरु केली आणि एकाहून एक सरस नाटके तसेच नवनवीन एकांकिकांचे प्रयोग सिंधुदुर्ग, बेळगांव, कराड, सांगली, मुंबई, गोवा या ठिकाणी गाजू लागले.. (बाबा वर्दम थिएटर्सचा इतिहास)

कोकणची रंगभूमी रंगभूषामहर्षी बाबा वर्दम

गौरवशाली परंपरेच्या पाऊलखूणा..

तुका म्हणे
सर्वांगसुंदर 'ऱ्हासपर्व'
परिपूर्ण 'पूर्णविराम'
पसरट एक्स्पायरी डेट
लगीन मोडलं...
सुदृढ आणि सशक्त घटोत्कच

बाबा वर्दम थिएटर्स चे समग्र मिडीया कव्हरेज

आरती प्रभू पुरस्कार

सन २०१३ पासून संस्थेने कुडाळ येथील नामवंत शैक्षणिक संस्था, कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळ यांचे सहयोगाने, कुडाळचे सुपुत्र तथा ज्येष्ठ साहित्यिक चिं. त्र्यं. खानोलकर तथा आरती प्रभू यांच्या नावे नाटककार व कवी म्हणून भरीव योगदान असलेल्या व्यक्तीस आरती प्रभू कला अकादमी, कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. अनिल नेरुरकर ( अमेरिका ) पुरस्कृत "आरती प्रभू पुरस्कार " सुरु केला आहे

संस्थेने आजवर सादर केलेल्या कलाकृती...

Close Menu