सन 2013 पासून संस्थेने कुडाळ येथील नामवंत शैक्षणिक संस्था, कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळ यांचे सहयोगाने, कुडाळचे सुपुत्र तथा ज्येष्ठ साहित्यिक चिं. त्र्यं. खानोलकर तथा आरती प्रभू यांच्या नावे नाटककार व कवी यांच्यासाठी 'आरती प्रभू पुरस्कार' सुरु केला आहे. सन 2013 साली गोवा येथील प्रसिध्द कवी नाटककार श्री. विष्णू सूर्या वाघ (गोवा), सन 2014 साली पुणे येथील प्रसिध्द नाटककार श्री. सतीश आळेकर (पुणे), सन 2015 साली प्रसिध्द नाटककार श्री. शफाअत खान (मुंबई), सन 2016 साली प्रसिध्द नाटककार श्री. महेश एलकुंचवार (नागपूर), सन 2017 साली प्रसिध्द नाटककार श्रीम. सई परांजपे (मुंबई), सन 2018 साली प्रसिध्द कवी श्री. महेश केळूस्कर (मुंबई), सन 2019 साली प्रसिध्द कवी श्री. किशोर कदम (मुंबई) यांना हा पुरस्कार देण्यात आला.