केदार सामंत : ९८२२३०९८८७, ८२७५३९०९०९

कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळ ही संस्था १९२९ साली अखंड हिंदुस्तानात कराची येथे स्थापन झाली. कराची मध्ये त्याकाळी अनेक मराठी कुटुंबे राहत होती. परंतु या मराठी लोकांसाठी मराठी माध्यमातून शिक्षणाची सोय नव्हती. त्यामुळे कै. द.व. अणावकर गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळातील कोकणी लोकांनी कराची मध्ये १२ जून १९२९ रोजी श्री. शिवाजी हायस्कूल या नावाने शाळा सुरु केली.

दरम्यान १९४७ साली भारत स्वातंत्र्य झाल्यावर फाळणी मुळे कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांना कराची सोडून भारतात परतावे लागले.१९४८ साली भारतातील सर्व संस्थाने भारतीय संघराज्यात विलीन करण्यात आली.त्यामुळे कुडाळ हायस्कूल,कुडाळची मालकी मुंबई सरकार कडे गेली.मुंबई सरकारने कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्यकर्त्याचा शिक्षण क्षेत्रातील अनुभव लक्षात घेऊन हि शाळा कै.श्रीमंत शिवरामराजे भोसले यांच्या अनुमतीने कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळाकडे सुपूर्त केली.

कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळाच्या नेतृत्वाखाली हळूहळू या शाळेचा सर्वागीण विकास होऊ लागला.१९७४ शाळेला कला ,वाणिज्य ,व विज्ञान या उचंमाध्यमिक तुकडया जोडल्या गेल्या.१९९३ साली अभ्यासकांची तुकडी सुरु झाली. मुलांच्या सर्वांगीण विकासाला वाव देण्यासाठी नृत्य ,नाट्य व संगीत यांचे परिपूर्ण प्रशिक्षण देणारी आरती प्रभू कला अकॅडमी सुरु केली.

Close Menu