केदार सामंत : ९८२२३०९८८७, ८२७५३९०९०९

कोकणातील लोकांनी नाटकांची परंपरा सुरु ठेऊन कोकणची रंगभूमी आजतागयात जपली आहे. तसेच कोकणातील कुडाळनगरीचा कलेचा वारसा फार जुना आहे. संगीतरत्न मा. कै. वसंतराव देसाई व रंगभूषा महर्षी कै. बाबा वर्दम या संगीत आणि रंगभूषा कलेतील मान्यवरांनी कुडाळचे नाव भारतीय कलाक्षेत्रात मोठे करून ठेवले आहे. आपल्या श्रेष्ठ गायनकलेने श्रीभाऊ माडयेबुवा यांनी कोकणात विशेषतः गोवा प्रांतात कुडाळचे नाव केले आहे. श्री. दयानंद बांदेकर, श्री. शंकरभाई वर्दम व एसदाजी सावंत या जुन्या जाणत्या नाट्यकलाकारांनी आपल्या नाट्यगुणांनी कोकणातील रसिकांना रिझवले आहे.

रंगदेवतेच्या आणि सर्व थोर कलाकारांच्या आशीर्वादाने गेल्या बारा वर्षात कोकणची रंगभूमी आपल्या नवनवीन, कल्पक व देखण्या नाट्यकलाकृतींनी बाबा वर्दम थिएटर्स, कुडाळ हा हौशी नाट्यसंघ गाजवत आहे. बाबा वर्दम थिएटर्स ग्रुप म्हणजे चंदू शिरसाट आणि त्याचे कलाकार मित्रमंडळ असून आपल्या कुशल नेतृत्वाखाली चंदू शिरसाटने हा नाट्यसंघ बांधला आहे.

Close Menu