केदार सामंत : ९८२२३०९८८७, ८२७५३९०९०९

 

दिग्दर्शक चंदू शिरसाट यांना कणकवली स्पर्धेत सतत तीन वर्षे दिग्दर्शनाचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक घेऊन हॅट्‌ट्रीक नोंदवत एकूण पाचवेळा प्रथम क्रमांक पटकावणारा एकमेव दिग्दर्शक हा विक्रम केला.

एखाद्या दमेकरी शाळा मास्तराला शोभावी अशी शरीरयष्टी असणारा हा चंदू आपल्या मोठया डोळ्यातून सतत काहीतरी नवीन शोधत, कलावंताची सांखळी जोडत असतो. संस्थेचा उत्कर्ष अनेकांच्या सहकार्यातून होत असतो चंदू शिरसाट हे नेहमीच अशा ‘अनेकां’च्या शोधत असतात. मग तो कलाकार असो व तंत्रज्ञ असो चंदू शिरसाट यांचा योग्य ठिकाणी उपयोग करून घेतो आणि बी. व्ही. थिएटर्सची यशोधावज्या फडफडत ठेवतो आणि बी. व्ही. थिएटर्स आपला दबदबा निर्माण करते.

बी. व्ही. थिएटर्सच्या यशस्वी वाटचालीच्या श्रेयाचा मोठा दिग्दर्शक या नात्याने चंदू शिरसाटांकडे जातो. नाटक बसवताना ते प्रेक्षकांना रुचेल, भावेल याचे भान दिग्दर्शकाला असावे लागते. चंदू शिरसाट ही जबाबदारी नजरे आड करत नाही. अरे अश्वत्थामा, दवबिंदू, मैत, काळकीचं बाळ, आणि देवनागरी या नाट्यकलाकृती पाहताना चंदूची निरीक्षण शक्ती, अभिनयाची जाण, अचूक पात्र योजना, कलाकाराला घडवण्याची त्यांची हातोटी, प्रसंगांच्या परिणामांची उत्कटता वाढवण्याचे त्यांचे चातुर्य या सर्वांचा प्रत्यय येतो.

व्यक्तिरेखांचे अचूक भावदर्शन हे नाटकाच्या यशातले अर्धे यश असते. म्हणूनच मैत, कळकी किंवा देवनागरी यातील अभिनयातील यशाचे श्रेय कलाकारांबरोबरच दिग्दर्शक चंदू शिरसाटांकडे जाते. ‘मैत’ मधला धर्म पूर्वीच केव्हापासुनतारी चंदू शिरसाटांच्या मनात घर करून असला पाहिजे. ‘मैत’च्या प्रेझेन्टशनची संधी त्याने सुभाष टोपलेकडून पांगळा, असहाय, कारुण्यपूर्ण ‘धर्म’ सत्कार केला. अशा विविध व्यक्तिदर्शनानेच मैतला सर्वत्र प्रशंसा मिळाली. कलाकारांचा ताफा रंगमंचावर आणून कमीत कमी संवादात प्रसंग यशस्वीपणे सादर करण्याचे धाडस चंदू सिरसाटांकडे कडे आहे.

‘काळकीच बाळ’ मधील कालको ही व्यक्तिरेखाही चंदू शिरसाटांच्या नाट्यप्रतिभेचा प्रत्येय देणारी वर्षा सामंतचा सर्वांग सुंदर अभिनय हे या एकांकिकेचे प्रमुख वैशिष्ट्य हे तर खरेच परंतु त्या व्यक्तिरेखेचे भावदर्शन मुद्राभिनय व्ही पदन्यास हे निश्चित चंदू शिरसाटांचेच. मैत काय किंवा काळकीचे बाळ काय दोन्ही आपले वेगळेपण सिद्ध करणाऱ्या तरीही त्या दोघांत उजवी कोणती हे ठरवताना मनाचा गोंधळ उडवणाऱ्या. हे यश कोणाचे? निखालस चंदू शिरसाटांचे.

प्रेक्षकांची आवडनिवड जाणून कथावस्तूंच्या स्वभाव वैशिट्यांसह संघर्षबिंदू व उच्च उत्कटबिंदू जाणून प्रभावी सादरीकरण करणे हे चंदू शिरसाटांच्या यशाचे गमक आहे.

अभिप्राय द्यायला विसरू नका!

Close Menu