केदार सामंत : ९८२२३०९८८७, ८२७५३९०९०९

बाबा वर्दम थिएटर्स कुडाळ आयोजित बाबा वर्दम स्मृती नाट्यस्पर्धा – २०२० च्या दुसऱ्या दिवशी (रविवार) अभिनय (कल्याण) निर्मित आणि आशुतोष दिवाण लिखित व अभिजित झुंजारराव दिग्दर्शित ‘घटोत्कच’ हे नाटक सादर झाले. अभिजित झुंजारराव हा हौशी आणि प्रायोगिक रंगभूमीवरील एक प्रयोगशील दिग्दर्शक. दरवेळी तो वेगळं आणि दर्जेदार देण्याचा प्रयत्न करतो आणि यावेळीही अभिजित त्यात यशस्वी झाला असे म्हणता येईल.
माणसातलं माणूसपण आज हरवत चाललंय. महाभारतातील पात्र जर माणूस म्हणून बघितली तर घटोत्कच हे नाटक आपल्याला आताच्या काळाशी रिलेट करता येईल. घटोत्कच हे नाटक एका सुंदर नाटकाचा अनुभव देऊन गेलं. आणि एका सर्वांगसुंदर नाट्यकलाकृतीचा आस्वाद रसिकांना घेता आला.

अभिप्राय द्यायला विसरू नका!

Close Menu