केदार सामंत : ९८२२३०९८८७, ८२७५३९०९०९

बाबा वर्दम थिएटर्स, कुडाळ आयोजित बाबा वर्दम स्मृती नाट्यस्पर्धा – २०२० च्या चौथ्या दिवशी (मंगळवार) नेहरू युवा कलादर्शन नाट्य मंडळ (पाली – रत्नागिरी) यांनी चैतन्य सरदेशपांडे लिखित आणि गणेश राऊत दिग्दर्शित ‘एक्स्पायरी डेट’ हे फॅन्टसी अधिक ब्लॅक कॉमेडीच्या अंगाने जाणारे नाटक सादर केले.
आजकाल समाज एवढा अँडव्हान्स झालाय की, माणसं प्रत्येक गोष्टीचा सोहळा करतात. माणसाच्या वागण्या-बोलण्यात फक्त औपचारिकता शिल्लक राहिली आहे. आणि यामध्ये आपण कुठेतरी नातेसंबंध, माणुसकी, आपुलकी, संवेदनशीलता हरवत चाललोय. आजची पिढी पारंपरिक विचारसरणी अवलंबित नाही आणि जुनी पिढी आधुनिक विचारसरणीचा स्वीकार करीत नाही, या दोघांमधील घालमेल लेखकाने ‘एक्स्पायरी डेट’ या नाटकात मांडली आहे.

अभिप्राय द्यायला विसरू नका!

Close Menu