बाबा वर्दम थिएटर्स आणि आरती प्रभू कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने कुडाळचे सुपुत्र व प्रसिद्ध कवी, नाटककार कै. चिं. त्र्यं. खानोलकर उर्फ आरती प्रभू यांच्या नावे कवी आणि नाटककार म्हणून उल्लेखनीय कामगिरी केलेल्या साहित्यिकास सन २०१३ पासून “आरती प्रभू पुरस्कार” देण्यात येतो.
यावर्षी हा पुरस्कार मुंबई येथील प्रसिद्ध नाटककार श्री. प्रेमानंद गज्वी यांना शनिवार दि. १५ फेब्रुवारी २०२० रोजी सायंकाळी ७.०० वाजता ज्येष्ठ लेखक, दिग्दर्शक मान. पुरुषोत्तम बेर्डे यांच्या हस्ते, सुप्रसिद्ध नेपथ्यकार श्री. नितीन नेरुरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच आरती प्रभू कला अकादमीचे अध्यक्ष मा. श्री. अविनाश उर्फ भाईसाहेब तळेकर यांच्या अध्यक्षतेखाली प्रदान करण्यात आला.