बाबा वर्दम थिएटर्स, कुडाळ आयोजित बाबा वर्दम स्मृती नाट्यस्पर्धा – २०२० च्या शेवटच्या दिवशी (शुक्रवार) श्री महालक्ष्मी कलामंच (मुंबई) निर्मित आणि राम दौड लिखित व संतोष सारंग दिग्दर्शित ‘तुका म्हणे’ नाटक सादर झाले. हे नाटक अध्यात्मिक अंधश्रद्धेवर आधारित सामाजिक विकृतीचे दर्शन घडविणारे आहे.
समाज म्हणून आपण किती भोळसट, ढोंगी, अंधश्रद्धाळू आहोत आणि याचा गैरफायदा राजकारणी लोक कसा उठवतात, याचे चित्रण राम दौड यांनी या नाटकात केले आहे.